जस्ट लाईक दॅट १ इथे वाचा
**
आदित्यची टेम्पररी व्यवस्था जीत आणि राजच्या अपार्टमेंटमध्ये केली होती. तेवढे दोघेच महाराष्ट्रीयन..बाकी भारतीय होते पण सगळे साउथचे. आदित्यला आश्चर्य वाटलं.
**
आदित्यची टेम्पररी व्यवस्था जीत आणि राजच्या अपार्टमेंटमध्ये केली होती. तेवढे दोघेच महाराष्ट्रीयन..बाकी भारतीय होते पण सगळे साउथचे. आदित्यला आश्चर्य वाटलं.
"आपण भारतीय असल्याची जाणीव जरी परदेशात गेल्यावर खऱ्या अर्थाने होत असली तरी इथेही स्थानिक पातळीवर हा भाषेचा प्रश्न आणि भेद येतोच.." राज म्हणाला.
"हो ना..मी मुंबईत वाढलो..मला मेट्रो क्राउडमध्ये राहून कधी भाषेचं महत्व जाणवलं नव्हतं..ते कळायला अमेरिकेला यावं लागलं" जीत हसत म्हणाला.
"जेवून घे...याने भात आणि कांदा-बटाट्याचा रस्सा केलाय" राज किचनकडे हात करत म्हणाला.
"ग्रेट...तुम्ही जेवलात?"
"तू सुरुवात कर..मी जॉईन करतो तुला..याला जरा बाहेर जाऊन यायचं आहे" राजने उत्तर दिलं.
"तू शिकून आलास की नाही काही जेवायला करायला?"
"चहा, कॉफी, नुडल्स आणि खिचडी.." आदित्यने चार टिपिकल पदार्थ सांगितले.
"शिकावं लागेल तुला सगळं! नाहीतर अवघड आहे"
"बाय द वे..तुझ्याबरोबर आली तिचं नाव रमा ना?" जीतने शूज घालत विचारलं.
"हं..रमा फडके!" आदित्य भातावर रस्सा ओतत म्हणाला.
"भारी बेब आहे रे..तुम्ही बरोबरच आलात का?"
"हो रे..म्हणजे हे मला इथे कस्टम्स झाल्यावर कळलं की ती माझ्या फ्लाईटला होती..रस्सा छान आहे"
"लई वाईट नशीब राव..तुला ती येणारे माहित नव्हतं?" जीतला रस्स्याच्या कौतुकाशी काही देणं-घेणं नव्हतं.
"नाहीरे मला इतका वेळच नव्ह्ता. तुला मेल करायचो तेवढंच."
"म्हणजे तुला तिच्याबद्दल काहीच माहित नाही?म्हणजे ती सिंगल आहे की..."
आदित्यला एकदम त्याने तिच्या सिंगल असण्यावर प्रश्न विचारल्यावर थोडं नवल वाटलं.
"माहित नाही रे..मला कुठे तिच्याशी लग्न करायचंय?" त्याने हसत विषय संपवायचा प्रयत्न केला.
"तसं नाही रे..आजकाल जेवढ्या मुली येतात ना त्यांची लग्न झालेली असतात किंवा ठरलेली असतात..एखादी इतकी चांगली दिसणारी मुलगी आली की ती सिंगल आहे का हा पहिला प्रश्न असतो"
"असो..माझ्याबरोबर जो अपार्टमेंट शेअर करणार होता तो आला का??" आदित्यने विषयांतर केलं. जीत आणि राजने एकमेकांकडे पाहिलं.
"तू सावकाश जेवून घे...आराम कर आज रात्री..दमून आला आहेस..आपण बोलू उद्या निवांत..घरी फोन करायचा असेल तर याचा मोबाईल वापर" आदित्यला ते काहीतरी सांगता सांगता थांबले असं वाटत राहिलं.
त्याला त्यांची अपार्टमेंट आवडली होती. दोघांनी आदित्यपेक्षा रमाची जास्त चौकशी केली होती. दोघांनाही गल्फ्रेंड नसावी म्हणून ते एवढे हातघाईला आलेत अशी त्याने मनाशी खुणगाठ बांधली.
दुसरीकडे रमाची राहायची सोय मेघा आणि दर्शनाकडे केली होती. रमा पोहोचली आहे कळल्यावर तिथे राहणाऱ्या अजून दोघी मनिषा आणि प्रियासुद्धा तिच्याशी ओळख करून घ्यायला आल्या. मुलांप्रमाणे महाराष्ट्रीयन मुलीदेखील कमीच होत्या. मेघा, दर्शना आणि मनिषा अशा तिघीच. प्रिया बँगलोरची होती. त्यामुळे ती असताना सगळे हिंदीत बोलायचे.
"फ्लाईट कैसी थी??"
"ओके..जर्मनी में ४ घंटे का ले-ओवर था.."
"ओह..तुने घर फोन कर लिया?"
"हां..एअरपोर्ट पे लेने जो लोग आये थे उनके फोन से फोन किया था"
"गुड, अगर वापस करना हो तो बोलना.."
"तुम लोगोंका खाना हो गया?"
"नही..ये आने का वेट कर रहे थे...अभी खाएंगे"
"ओह गुड..तो तुम लोग खाना खा लो..सुबह मिलेंगे" म्हणून मनिषा आणि प्रिया निघून गेल्या.
"तुम्ही माझ्यासाठी जेवायला थांबलात?"
"थांबलो वगैरे नाही गं...रोज साधारण याच वेळी जेवतो आम्ही..त्या दोघी लौकर जेवतात..त्यांना आपण जेवायला थांबलोय असं म्हटलं नसतं तर अजून बसून राहिल्या असत्या.." मेघा म्हणाली.
तेवढ्या वेळात दर्शुने प्लेट्स, पाणी घेतलं होतं आणि भात पानांमध्ये वाढायला सुरुवात केली होती. जेवायला सुरुवात केल्यावर पहिला हमखास प्रश्न दर्शुनेच विचारला-
"तुला जेवण करता येतं ना गं?"
"हो..येतं"
"ग्रेट..पोळ्या येतात?"
"हो..म्हणजे मी टाईमपास म्हणून काही थाई आणि इटालियन कुकिंगचे क्लास पण केलेत.." मेघा आणि दर्शुने एकमेकींकडे विक्षिप्तपणे पाहिल्याचं रमाच्या नजरेतून सुटलं नाही. तिला पुन्हा आपण 'गर्दीतून' बाहेर उभे राहतो आहोत असं फिलिंग यायला लागलं.
"अगं हिला त्या अनिताचं सांगितलं का?" मेघाने विचारलं.
"काय झालं तिचं?" रमाने विचारलं.
"अगं तिचा विसा रिजेक्ट झालाय..सो ती येणार नाहीये.."
"मग आता??ती माझ्याबरोबर अपार्टमेंट शेअर करणार होती ना?"
"हो..पण ती येत नाहीये..आम्ही दुसरं कुणी येतंय का त्याची चौकशी करायला लावली आहे...इथल्या केअर टेकरशी थोडे दिवस तुला थर्ड रूम-मेट म्हणून घेण्याबद्दल उद्या बोलूच आपण.."
"तो हो म्हणेल ना?"
"नाही का म्हणेल तो? आपण सांगू की काही ऑप्शन नाहीये म्हणून...मुलांकडे पण तेच होणारे..."
"का?"
"तुझ्याबरोबर तो आदित्य परचुरे आलाय ना..त्याच्याबरोबर अपार्टमेंट नितीन शेअर करणार होता. पण नितीन गेलाय इंटर्नशिपला आणि त्याला तिथे एक्स्टेन्शन मिळालं आहे आणि तो अजून ६ महिने तरी येणार नाहीये..सो
आदित्यलाही कुणी पार्टनर नाहीये..."
"मग आता?"
"आता तू टेन्शन घेऊ नको..सगळं होईल नीट..विचार नको करू..काही वेळी आपण उगाच फार विचार करत बसतो..गोष्टी व्हायच्या तशा होणारच आहेत... 'जस्ट लाईक दॅट!'..डोन्ट वरी..!
No comments:
Post a Comment