Pages

Saturday, July 14, 2012

जस्ट लाईक दॅट ५

आत्तापर्यंत:

"मला ही डिस्पोझेबल प्लेट्स ही कल्पना जाम आवडली आहे.घासायला भांडी कमी..आपण नेहमी वापरायला याच आणूया का?" आदित्यने हसत विचारलं. रमाने जेवण केल्यामुळे भांडी घासायचं काम त्याने घेतलं होतं.
"काही गरज नाही. तुझी प्लेट तू घासशील आणि माझी प्लेट मी घासेन..कशाला पाहिजेत डिस्पोझेबल प्लेट्स?" रमाने उरलेली भाजी एका भांड्यात काढत म्हटलं.
"हो ते पण ठीक आहे!आपल्याला काही भांडी कमी पडणार नाहीत ना? मी आईला एक लिस्ट दिली होती..त्यातली सगळी भांडी मी आणली आहेत मी"
"हो रे..खरंतर कित्येक गोष्टी डबल आहेत आपल्याकडे.मसालेसुद्धा कित्येक महिने पुरतील.." आदित्यने भांडी घासायचं थांबवून चमकून तिच्याकडे पाहिलं. त्याची नजर तिला समजली. एकत्र राहायची दुसरी समाधानकारक सोय होईपर्यंत काही महिन्यांपुरती सध्याची सोय कंटिन्यू करायचं दोघांनी ठरवलं होतं. तिने नजर फिरवली आणि दुसरं काहीतरी करायला लागली. त्याने पुन्हा भांडी घासण्याकडे लक्ष वळवलं.


"सगळ्यांना खूप नवल वाटलंय आपण एकत्र राहण्याचं" आदित्यने पुन्हा शांततेचा भंग केला.
"हो आणि सगळ्यांना नवल वाटतंय या गोष्टीचं मला नवल वाटतंय..मला कधीच वाटलं नव्हतं की अमेरिकेत माणसं असा विचार करत असतील" 
"अमेरिकेला असली तरी माणसांची भारतीय मनोवृत्ती कशी बदलणार? खरं सांगायचं तर आपण थोड्या युनिक सिचुअशनमध्ये अडकलो म्हणून..नाहीतर आपणसुद्धा इतरांसारखे राहिलो असतो आणि भविष्यात कुणाच्यातरी असं करण्याने आपल्याला नवल वाटलं असतं. माझ्या मते सोसायटीचा घटक म्हणून आपण परंपरांचे पाईक असतो. रूढ झालेल्या पद्धतींमध्ये काही फरक पडला तर आपण आधी भांबावतो. मग तो बदल सकारात्मक वाटला तर स्वीकारतो आणि बदल करणारे पुढारी होतात"
"परंपरांचे पाईक..बापरे..तू खूप पुस्तकं वगैरे वाचतोस का? आणि हो तो पुढारीवाला पार्ट आवडला मला..पण आपल्या केसमध्ये हे क्रेडीट आपल्या दोघांचं आहे"
"हो हो..मी कुठे नाही म्हणतोय? आणि वाचनाचं म्हणालीस तर माझ्या बाबांचं पुस्तकांचं दुकान आहे..मी गेले काही महिने वेळ घालवायला दुकानात बसायचो..वाचन व्हायचं..त्यामुळे बोलताना नकळत असे अवघड शब्द सुचतात.."
"एकीकडे असे अवघड शब्द बोलतोस आणि तू म्हणत होतास की की तुला आपली भाषा न बोलणाऱ्या लोकांमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये.."
"हो..बरोबर आहे की..प्रॉब्लेम त्यांना झाला असता" तो हसत म्हणाला.
"हां..पण माझ्या बाबांना आवडतात अशी अवघड मराठी बोलणारी माणसं...म्हणजे पुढे मागे मराठी भाषा वाचवायला चळवळ वगैरे सुरु झाली तर माझे बाबा नक्की असतील त्यात..बाय द वे..दॅट रीमाइंडस मी..तू त्यांच्याशी बोलणारेस ना?" रमाने सावध होत विचारलं.
"हो बोलेन की..त्यात काय एवढं" तो ओशाळून हसत म्हणाला.
"मग सकाळी फोन करेन मी त्यांना..गुड नाईटरमा तिच्या खोलीकडे वळत म्हणाली.
"रमा..एक मिनिट..."आदित्यने तिला थांबवत विचारलं.
"काय?" तिने केस मानेवरून पुढे घेत एका बाजूला केले आणि ती वळली.
".." आदित्य क्षणभर थांबला..."..मला खरंच तुला परत विचारायचं आहे...आपण करतोय ते योग्य आहे ना?आर यु शुअर..अबाउट ऑल धिस?"
"आपण बोललोय आदित्य याबद्दल..तू असा प्रश्न विचारून मला गोंधळात टाकतो आहेस.."
"गोंधळ उडालाय खरा..म्हणजे नाही उडालाय..म्हणजे..सगळयांना प्रश्न पडलाय की आपलं एकत्र राहणं याला निव्वळ तडजोड हे कारण नाही.."
"मग असं काही आहे का?" रमाने विचारलं.
"नाही.." 
"मग विषय संपला..गुड नाईट..सकाळी भेटू..उद्या तू चहा करणारेस ना?"
"..हो..गुड नाईटतो त्याच्या बेडरूमकडे वळला.

गेले दोन दिवस पलंगावर आडवं पडल्यावर त्याच्या डोक्यात हेच विचार चालू होतेआयुष्यातले महत्वाचे निर्णय त्याने कधीच स्वतःचे स्वतः घेतले नव्हतेत्याने काय शिक्षण घ्यायचं हे कायम कुणीतरी दुसरं ठरवायचा आणि तो मान्य करायचाअमेरिकेला येण्याचा निर्णयसुद्धा कुणीतरी सुचवलं म्हणून त्याने घेतला होतारमाबरोबर राहण्याच्या बाबतीत मात्र भलतंच घडलं होतंगमती-गमतीत एकत्र राहण्याच्या पर्यायाचा उल्लेख करणं वेगळं होतंपण पुढच्या घडामोडी बऱ्याच पटापट घडल्याराघवने सांगितलं तसं केअर टेकर फ्रेंडली 
नव्हतात्याने थोडसं लांब दुसरं अपार्टमेंट रेंट करायचा किंवा दुसरीकडे जाऊन काही इतर लोकांबरोबर राहण्याचा सल्ला दिलापण राज-जीतमुळे आदित्य आणि मेघा-दर्शुमुळे रमाला तिथेच जवळ राहायचं होतं.  
"आम्ही दोघे जर का एका अपार्टमेंटमध्ये एकत्र राहिलो तरआम्हांला दोघांना एकत्र एक अपार्टमेंट मिळेल ना?" आदित्य बोलून गेलाजीत-राज-रमा-मेघा-दर्शु इतकंच काय तर केअर टेकर माइकसुद्धा क्षणभर भांबावला.
"हो हो..मग माझी काहीच हरकत नाही..शेवटी एका घरात  जणांनी राहावं हा नियम पाळला जातोय हे बघणं माझं काम..मग दोघे 
कोण आहेत याच्याशी मला काही घेणं-देणं नाहीमाईकने स्वतःला क्षणात सावरून हजरजबाबीपणे उत्तर दिलं.
"ठीके..आम्ही तुला थोड्या वेळाने येऊन भेटतोराजने विषय वाढण्याआधी आवरता घेऊन सगळ्यांना तिथून बाहेर काढलं.
 जण बाहेर येऊन उभे राहिलेतेवढ्यात त्यांना कॉलेजमधून परत येणारी मनीषासुद्धा येऊन भेटलीचर्चेचा विषय अर्थात आदित्यने 
त्याने आणि रमाने एकत्र एका घरात राहण्याचं सोडलेलं पिल्लू.
"गाय्स..धिस इस अमेझिंग..मला माझे मुंबईतले दिवस आठवले.." इति मनीषा.
"तुम्ही खरंच असं काही करणार आहात?" मेघाने विचारलं.
"तुम्ही डेंजरस आहात..आम्हांला काहीच कल्पना दिली नाहीत.." राज
"म्हणजे..कल्पना वाईट नाहीये...पण--" दर्शु
सगळ्यांकडे प्रश्न वेगवेगळे असले तरी त्यांचा रोख आदित्य-रमाने एका घरात एकत्र राहायचं ठरवलं या एकाच गोष्टीकडे होताआदित्यला जाणवलं की लोक कारण नसताना रमाकडे बघतायतत्याने सगळ्यांना थोडा आवाज चढवत थांबवलं.
"अरे...सायलेन्स..एक मिनिट..मी त्या माईकला घोळत घ्यायला काहीतरी पिल्लू सोडलं..मी आणि रमाने एकत्र राहायची कल्पना गम्मत म्हणून डिस्कस केली होतीयात तिचा काही संबंध नाही..आणि रमा..सॉरी..मी असं बोलायला नको होतं"
"ओके..मग आता आपण काय करणार आहोत?" जीत इतका वेळ काही बोलला नव्हता.
"पण काही दुसरा पर्याय नसेल तर आम्ही एकत्र राहू शकतो ना?" हा अनपेक्षित प्रश्न रमाकडून आल्यावर आदित्यसकट सगळ्यांनी 
चमकून तिच्याकडे पाहिलं. 

रमा कुशीवर वळलीतिलाही तो प्रसंग जसाच्या तसा आठवत होतातिला त्या निर्णयाचा अजून तरी पश्चाताप झाला नव्हताभारतात गोष्ट वेगळी होतीतिथे ती एका खूप मोठ्या शहरात राहत होतीसामाजिकआर्थिक निकष वेगळे होतेआता देश बदलला. 
लहानपणापासून गर्दीत मिसळण्याचे प्रयत्न करण्याचे दिवस आता राहिले नव्हतेमुख्य म्हणजे गर्दीच राहिली नव्हतीत्यामुळे आता 
तिची वेगळी ओळख असावी असं तिला वाटणं फार सहाजिक होतंआदित्य हा एक प्रकारे तडजोड-सोयीस्कर प्रकार होतामुलगा 
वागा-बोलायला चांगला होतादुसऱ्या शहरात वाढला असला तरी घरचे संस्कारचालीरीती आपल्यासारख्याच असतील हे अजून एक 
कारण होतंतिने निर्णय घेऊन झाला होता. 

आयुष्यातला तिचा पहिलाच मेजर निर्णय..कोणतंही प्लानिंग  करता घेतलेला..आयुष्यातला त्याचा पहिलाच निर्णय..त्याचा त्याने 
घेतलेला!!
'जस्ट लाईक दॅट!'

क्रमशः

भाग ६ इथे वाचा

3 comments:

Chaitanya Joshi said...

ही पोस्ट टाकताना युनिकोडच्या वापरात मी कुठेतरी चुकलो बहुतेक..त्यामुळे प्रेसेंटेशन बिघडलंय..चू-भू द्या-घ्या!!

Chhaya Thorat said...

Great going Chaitanya...awaiting for next post...

Chaitanya Joshi said...

धन्यवाद छाया ताई..:) पुढची पोस्ट लौकरच!!